(बाळक्रीडा अभंग)
3875.
(बाळक्रीडा अभंग)
कृष्णाचिया सुखे भुक नाही तहान । सदा समाधान सकळांचे ॥१॥
कळलेंचि नाही झाले किती दिस । बाहेरिल वास विसरली ॥२॥
विसरु कामाचा तुका म्हणे झाला । उद्वेग राहिला जावे यावे ॥३॥
अर्थ :
गोपाळांना कृष्ण सुख झाले त्यामुळे त्यांना तहान भूक लागत नव्हती ते सर्व सदा समाधानी झाले होते. त्यांना किती दिवस झाले हे देखील कळले नाही आणि सर्व विषय ते विसरुन गेले. तुकाराम महाराज म्हणतात, त्या सर्व गोपाळांना कृष्ण सुख झाले त्यामुळे त्यांना बाहेरील कामाचा विसर पडला आणि जन्ममरणाचे दु:ख तर त्यांना राहिलेच नाही.
