(बाळक्रीडा अभंग)
3849.
(बाळक्रीडा अभंग)
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणांसाठी होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधी ॥२॥
आधी पाठीमोरी झाली ती सकळे । मग या गोपाळे बुडी दिली ॥३॥
दिली हाक त्याणे जाऊनि पाताळा । जागविले काळा भुजंगासि ॥४॥
भुजंग हा होता निजला मंदिरी । निर्भर अंतरी गर्वनिधि ॥५॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचे ॥६॥
चेंडुवाचे मिसे काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण ॥७॥
अर्थ :
कृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला हे समजल्यानंतर सर्व लोक यमुनेच्या तीरावर आले परंतु कोणीही कृष्णाला वाचवण्यासाठी यमुनेच्या डोहात उडी देखील मारली नाही उलट भयाने सर्व लोक मागे सरले आणि शेवटी जे ते आपआपल्या घरी निघून गेले यामुळे देवाला सर्वांच्या अंत:करणातील खरे काय आहे हे कळून आले परंतु डोहामध्ये वेगळयाच कारणासाठी देव गेला होता. देव सुरवातीला पाताळात गेलाच नव्हता वरतीच होता सर्व गोकुळवाशीयांचा आपल्याविषयी असलेला भक्तिभाव व प्रेम देव पहात होता परंतु कोणाचेही आपल्याला वाचवण्याचे धैर्य झाले नाही हे समजल्यावर देव नंतर पाताळात खाली गेला. यमुनेच्या तीरावर आलेले सर्व गोपाळांनी यमुनेच्या डोहाकडे पाठ केली व जो तो आपल्या घराकडे मागे निघाला त्यावेळी मग कृष्णाने यमुनेच्या डोहात खोल उडी दिली. मग देवाने पाताळात जाऊन कालिया नावाच्या भुजंगाला हाक मारली व त्याला जागे केले. भुजंग आपल्या घरामध्ये अगदी निवांतपणे झोपलेला होता सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेला भुजंग गर्वाचा निधीच होता. केवळ चेंडूचे निमित्त करुन कालिया नावाच्या भुजंगाचे ग
