आशीर्वादपत्र ३८४९
3849.
आशीर्वादपत्र ३८४९
चिरंजीव जीवाजीपंत ठाणेदार । वास्तव्य देहपूर । यासी आत्मारामपंत । यांचाआशिर्वाद । पत्र लिहणे कारण जे । तुम्हासीदेहगांवची सनद । शंभर वर्षांची देऊन पाठविले । कलमतपशील । गांवची अबादी करावी । क. ॥१॥ कामक्रोध हे रयत त्यांचे ऐकू नये॥क. ॥२॥आशामनशा यांची संगत धरू नये॥क. ॥३॥ सदास्वकर्मे वागणुक ठेवणे॥क. ॥४॥ शांतीक्षमा दयाअसो देणे॥क. ॥५॥ ज्ञान वैराग्य भजनपूजनीआदर ठेवणे॥क. ॥६॥ ही कलमें कबुल होऊनतुम्हांस रवाना केले । तुम्ही तो ते विसरून सदरींचेकलमांस न अनुसरून । वाईट वागणुकीचा रस्ताकाढला । तोतुम्हांसपरिणामी बाधक होईल । सावधरहाणे । एका जनार्दनी शरण । हेआशिर्वादपत्र ॥१॥
