ऐका ऐका पाटीलबोवाजी
3871.
ऐका ऐका पाटीलबोवाजी । गांव बराराखा राजी । उद्यां येतील यमाजी बाजी । फटफजीती होईल की जी मायबाप ॥१॥ जोहारमायबाप धनी । उठा उठा झोंप सोडूनि । काळभरला उरेना कोण्ही । पुढे पडाल काळाचे वदनीकी जी मायबाप॥२॥गांवातील रयत स्वाधीनकरा । कुळकर्णी आधी हाती धरा । तरीच तुमचाबरा थारा । मोडेल कोपट होईल चुरा की जीमायबाप ॥३॥ कामाजी देशमुख मोठा मस्त । क्रोधाजी नाईक मिळाले त्यांत । मदाजीबोवा त्यासीशिकवित । मत्सर वान पुढे भुकंत की जीमायबाप ॥४॥ दंभाजीची भारी हांव । अहंकारपंतांने वोस केला गांव । जीवाजी तुम्हीविसरला धन्यांचे नांव । या सहा जणांची हावधरून की जी मायबाप ॥५॥ आता तुम्ही विचारकरा । मुळचा मार्ग हळुहळु धरा । तेणेंचुकेल तुमचाफेरा । एका जनार्दनी तुटेल सारा । दोरा की जीमायबाप ॥६॥
