अभयपत्र ३८५१
3851.
अभयपत्र ३८५१
अभयपत्र जीवाजी पंतास । कळावें कीमौजे देहपूरची वागणुक उत्तम स्वधर्मयुक्त चालवू । ऐशी तुम्ही लिहुन कळविली । तेणेकरून धन्यासफार संतोष जाहला । जाणोन धन्याने तुमच्यागावच्या अबादीकरितां । ज्ञानवैराग्यासह शांती,क्षमा, दया हे ताबडतोब रवाना केले । मौजे मजुकरीपावतांच । यांचा अंगिकार करून वहिवाट सुरूकरणे । या कामी कोणाची हरकत धरू नये । मागाहून स्वधर्मपंताची स्वारी येणार आहे । तुम्हीआपले हुशारीत राहणे । लिहिलेप्रमाणे वर्तणुकठेवणे । एका जनार्दनी शरण हे अभयपत्र दिलेसही ॥१॥
