(बाळक्रीडा अभंग)
3894.
(बाळक्रीडा अभंग)
दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥
हासे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये प्राकृत म्हणो यासि ॥२॥
यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाही ठाव धांडोळिता ॥३॥
धांडोळिता श्रुति राहिल्या निश्चेत । तो करी संकेत गोपींसवे ॥४॥
गोपिकांची वाट पाहे द्रुमातळी । मागुता न्याहाळी न देखता ॥५॥
न देखता त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळा ॥६॥
वेळोवेळा पंथ पाहे गोपिकांचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥
अर्थ :
कृष्ण हा दीनांचा कृपाळू आहे, दुष्ट जनांचा काळ आहे व तोच एक सर्वत्र व्यापक आहे. हा कृष्ण सर्वांबरोबर हसतो, बोलतो त्यामुळे हा प्राकृत आहे सर्वजणांप्रमाणे हा सामान्य आहे असे कोणीही म्हणू नये. याला समजून घेण्यासाठी केवळ एकनिष्ठ भक्तिभाव लागतो दुस-या कोणत्याही साधनेव्दारे याला शोधण्याचा प्रयत्न केला तरी हा सापडत नाही. ज्या देवाचा शोध करण्यासाठी श्रृती, वेदशास्त्र आणि वेद यांनी प्रयत्न केला पण यांना तो काही केल्या सापडला नाही नंतर त्या निवांत राहिल्या निश्चिंत राहिल्या असा तो श्रीकृष्ण गोपीकांना मला अमूक वेळेत भेटा, मला या वेळेत येऊन भेटा असे संकेत करतो. गोपीकांची वाट हा श्रीकृष्ण वृक्षाच्या खाली जाऊन पाहात होता त्या येतानी दिसतात का नाही तो पुन्हा पुन्हा न्याहाळून पाहात होता. त्या गोपीका येताना दिसत नसल्या की, हा वेडावल्यासारखा व्हायचा, सारखा उठायचा, बसायचा त्यांची वाट पाहातच बसायचा. तुकाराम महाराज म्हणतात, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी अशा चारही वाणींना ज्याचे वर्णन करता येत नाही असा श्रीकृष्ण गोपीकांची वाट वेळोवेळ
