जोहार मायबाप जोहार ।
3889.
जोहार मायबाप जोहार । मी विठोबापाटलाचा महार । सांगतो सारासार विचार । ऐकाकी जी मायबाप ॥१॥ गांव तो पांचा पाटलांचा । पंचवीस प्रजांचा । येथे सहाजणांचा कारभारकी ॥२॥ ज्या धन्याचे हे शहर । त्या धन्यासीनाहीं जोहार । अवघा ओढीत कारभार । ऐजीकडेकी ॥३॥ ऐजीची चाली फार । सारा ओढीतातीकारभार । परी सहाजणांसी आधार । ऐजीचाचकी ॥४॥ बाप तुम्ही धन्यासी राजी राखा । नाहींतरी शेवटी होईल वाखा । मग कोणी नाही सखा । सोडविता की जी मायबाप ॥५॥ कामाजी बाजीहद्देदार । क्रोधाजी हा सरदार । यांचे वेगळालेविचार । ऐका की जी मायबाप ॥६॥ मदाजीबाजीचे वेगळे बंड । त्यासी मिळाला लोभ भावंड । अवघ्यानी मिळोनी थोतांड । रचिलें की जीमायबाप ॥७॥ गांव तो होता चांगला । परी यासहाजणांनीच नाश केला । तुम्हीही त्यासीचमिळाला । हे बरें काय की जी मायबाप ॥८॥ परीते रहातील एकीकडे । शेवटी गांठ तुम्हांसीचपडे । मग इकडे ना तिकडे । हो ना की जीमायबाप ॥९॥ ऐजीने यांस कारभार दिला । यांनीच गांवचा नाश केला । शेवटी खाईलतुम्हांला । हे बरें की जी मायबाप ॥१०॥ गांवांतील तीन पांचथोर । पंचवीस त्यांचा विस्तार । घडी घडी त्यांचा समाचार । घेत जावा की जीमायबाप ॥११॥ रयतेचे फार हित करावे । धन्याचे कामासी रूजू असावे । धनी सेवेसी तत्परव्हावें । लागते की जी मायबाप ॥१२॥ तुम्हांसधन्याने दिला गांव । तुम्ही विसरला त्याचे नांव । तलब आलिया लपवाया ठाव । मग कैंचा की जीमायबाप ॥१३॥ तुम्ही धन्यासी करिता चोरी । ऐजीकडे करिता येरझारी । परी या सहाजणांसीसारी दोरी । तुमचीच की जी मायबाप ॥१४॥ परीजेव्हां होईल ठावें । तेव्हा कळो येईल स्वभावे । घडी घडी आपुले हित करावे । लागते की जीमायबाप॥१५॥ जेव्हा तलब होईल धन्याची । तेव्हा तुम्हा मुदत कैंची । म्हणोनी सहा जणांची । भीड धरूं नका की जी मायबाप ॥१६॥ आता । ऐजीची आस्था सोडा । धन्याची बाकी हळुहळुझाडा । नाहींतरी पायी पडेल खोडा । प्रपंचाचाकी जी मायबाप ॥१७॥ आता असो अधीउपाधी । धन्याची भेट घ्यावी आधी । ते मी सांगतोंसुबुध्दी । ऐका की जी मायबाप ॥१८॥ परि मीलहानसा दिसतो महार । मजवरी धन्याचिअखत्यार । बहूत धन्याचा प्यार । मज नफरावरकी जी मायबाप ॥१९॥ सद्भाव शांतीसी घ्यावें । मज पाठीसी तुम्ही असावे । जेथे धणी धर ठावें । मज नफरास की जी मायबाप ॥२०॥ श्रवणाचीधरावी वाट । कीर्तनाचा चढावा घाट । विष्णुस्मरणाचा संघाट । आहे की ॥२१॥ पुढेआहे विश्रांतीचे स्थान । सज्जनांचे पाद सेवन । दास्यत्व अर्चन वंदन । ध्यान मार्ग की ॥२२॥ तेथे जाता न लगे उशीर । समीप जनार्दन दातार । सख्य भक्तीचे मंदीर । आहे की॥२३॥पुढे आहेधन्याचें घर । तेथे जाऊन करावा जोहार । मुखीजपावा परात्पर । जवळींचा की ॥२४॥ जेव्हाभेटी होईल धन्याची । तंव नित्य दिवाळी सुखाची । मग सर्वसत्ता तुमची । होईल की ॥२५॥ जेथेंआहेत धनीं । तेथे जावे लोटांगणी । मग स्वतांचहोईल मिळणी । आत्मसुखाची की ॥२६॥ यामागे गेले थोर थोर । नारदादि शुकेश्वर । धन्याचेदरबारी निरंतर । राहताती की ॥२७॥ जे जे यामार्गे गेले । ते धन्यासी रूजू झाले । जीवन्मुक्तिपावले । ऐका की ॥२८॥ जोहार मायबाप जोहार । गव्हाची रोटी तुपाची धार । धन्यांनी पूरवावी । अपार । मज नफरास की ।॥२९॥ महार बोलतोम्हणोनि नका जाऊंगर्वे । नाही तरी शरीर राहीलहिरवें । आपुले स्वहित होईल बरवे । ते करावे की ॥३०॥ बाकी साठी आपली मुळभुई सोडाल । परमुलखा जरी जाल । तरी बाकीचा निकाल । नाही की॥३१॥धरा भावभक्तिची कुळवाडी । कांढा शेतांतील पेंढी । नाही तरी पायी पडेल बेडी । अविद्येची॥३२॥हे कायापूर नगरी । ब्रह्मयानेरचिली खरी । म्या विवे के जाणूनि बरी । आत्मरूपी आर्पिली की॥३३॥एका जनार्दनींकुळवाडी मोठा । त्याने बाकीस मारिला फांटा । अखंड कैलासींचा दारवंटा । मोकळा केला की॥३४॥अखंड कैलासींचे रहाणे । गुरूजनांचे हेचदेणें । सुखसमाधी असणें । ऐका की जी मायबाप॥३५॥
