वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 239. जोहार ३८६२ ते ३८९८

जोहार मायबाप जोहार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090447 · अभंग क्र. ३८७४

3874.
जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा । महार । सांगेन अवघा विचार । जिवाजीचा की जीमायबाप ॥१॥ जिवाजीनें सारा गांव । बुडविण्याचीधरली हांव । त्यासी मिळाले कामाजीराव । मगअन्याय सहजचि की० ॥२॥ कामाजी बाजीसमिळाले । क्रोधाजी गांवांत सहज शिरले । लोभाजीचें । ठाणे जोडले । मग विसरले धन्यासी की० ॥३॥ मदाजी बाजी तो जाहलें मस्त । त्यांनी गांवपांगविला दरोबस्त । मत्सर बावा उन्मत्त । आपआपणांत मिळाले की० ॥४॥ दंभाजीम्हणविती चौधरी । सदा बैसती आपुले घरीं॥धन्याची तलब आलियावरी । गांडीवरी टोलेकी० ॥५॥ अहंकार पोतनीस कारभारी । तेजिवाजीस ठेविती धाब्यावरी । त्याची भरोवरी । कोण करील की० ॥६॥ याची नका धरूं संगती । तेणे तुमची न चुके पुनरावृत्ती । एका जनार्दनीकरी विनंती । संती ऐकावे की जी मायबाप ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग