वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079809 · अभंग क्र. ३८५०

3850.
(बाळक्रीडा अभंग)
काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशी । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥
लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥
उगवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदे वांकी नभा देखे पायी ॥३॥
पाहिला सकळ तिने न्याहाळूनि । कोण या जननी विसरली ॥४॥
विसरु हा तीस कैसा याचा झाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥
दिसतसे रूप गोजिरे लाहान । पाहाता लोचन सुखावले ॥६॥
पाहिले पर्तोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडे झाले आता ॥७॥
आता हा उठोनि खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥८॥
जीव याचा कैसा वाचे म्हणे नारी । मोहिली अंतरी हरीरूपे ॥९॥
रूपे अनंताची अनंतअपार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥

अर्थ :
कालियाच्या पत्नीला कृष्णाने चेंडू मागितला त्यावेळी तिने तेज:पुंज अशा हरीला पाहिले. लावण्याचा पुतळा आणि कोटी सूर्य, चंद्र उगवलेत असे हरीची मुखप्रभा तिने पाहिली. जणू कर्दळीचा गाभा हातामध्ये वाकी पायामध्ये तोडे व नीळवर्ण हरी तिने पाहिला. कालियाच्या पत्नीने हरीला पूर्णपणे न्याहाळून पाहिले आणि मनातच म्हणू लागली की, कोणती आई अशी आहे की, इतके सुंदर बाळ पाण्यात पडले आणि ती त्याला विसरुन गेली. हे बाळ जीवापेक्षाही अधिक आवडते असेल परंतु तरी देखील त्या आईला त्या बाळाचा विसर तरी कसा पडला ? हरीचे लहान गोजिरे सुंदर रुप त्या कालियाच्या पत्नीला दिसत आहे ते पाहून तिच्या डोळयाला अतिशय सुख झाले आहे. मग तिने आपल्या दुष्ट पती कालियाकडे पाहिले व तो उठलेला पाहून ती म्हणाली, आता हे फारच वाईट झाले. आता हा दुष्ट उठेल आणि या सुंदर बाळाला खाईल आणि मग ही वार्ता त्याच्या आईला समजली की, मग ती कोल्हाळ

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग