वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079529 · अभंग क्र. ३८६९

3869.
(बाळक्रीडा अभंग)
कृपावंते हाक दिली सकळिका । माजिया रे नका राहो कोणी ॥१॥
निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवर्धन उचलिला ॥२॥
लाविले गोपाळ फेरी चहूंकडे । हासे फुंदे रडे कोणी धाके ॥३॥
धाके ही सकळ निघाली भीतरी । उचलिला गिरी तयाखाली ॥४॥
तयाखाली गाई वत्से आली लोक । पक्षी सकळिक जीवजाति ॥५॥
जिही म्हणविले हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी नरी ॥६॥
जाति कुळ नाही तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे ॥७॥

अर्थ :
ज्यावेळी इंद्राने अतिवृष्टी केली त्यावेळी कृपावंत भगवंताने गोवर्धनगिरी पर्वत उचलला व सर्वांना सांगितले की, कोणीही बाहेर थांबू नका, सर्वांनी गोवर्धनगिरी पर्वताखाली या. भगवंताने ज्यावेळी गोवर्धनगिरी पर्वत उचलला त्यावेळी सर्वजण पावसाच्या भितीने गोवर्धन पर्वताच्या खाली निघाले. देवाने सर्व गोपाळांना चहूकडे फेर धरुन उभा राहण्यास सांगितले तर काही गोपाळ पावसाच्या भितीने हसू लागले तर काही फुंदू फुंदू रडू लागले. ज्यावेळी भगवंताने गोवर्धनगिरी पर्वत उचलला त्यावेळी पावसाच्या धाकाने सर्वजण त्याच्याखाली निघाले. त्याखाली सर्व गाई, वत्स व सर्व लोक आले होते पक्षी व सर्व जीव जंतु त्याच्याखाली आले होते. कोणत्याही जातीचे जरी असले परंतु हरीला स्वत:चे दास म्हणून ज्यांनी घेतले त्या सर्वांना हरी आश्रय देतोच. तुकाराम महाराज म्हणतात, जात आणि कुळ देवाच्या ठिकाणी प्रमाण नाही जो देवाचा भक्त आहे त्याच्याशीच देव अनन्य राहतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग