जोहार मायबाप जोहार ।
3884.
जोहार मायबाप जोहार । मीजनार्दनाचा एका महार । सांगतो तुमचे नगरींचासमाचार । तो ऐका की जी मायबाप ॥१॥ नगररचना केली । बारा वेशी तया ठेविली । नवखिडक्यांची चाली । तेथे ठेविली की ॥२॥ गांवचीरचना जाहली पूर्ण । कळस आणि पाया एकचिजाण । जागोजाग वेशिला राखण । मज ठेविलेंकी ॥३॥ जीवशिव अधिकारी । नगराचे मुख्यकारभारी । जीवाजी तेथे वहिवाट करी । शिवाजीउगेच पहाती की ॥४॥ जीवाजीचे कारभारी । कामक्रोधादि अधिकारी । मना वाटेल तैशा परी । गांवात नाचती की ॥५॥ जीवाजीचे न चले कांहींमनाजी देती ग्वाही । दंभाजीची भल भलाई । सहज जाहली की ॥६॥ मिळाले एकमेंकाचेमिळणी । गेले माझ्या धन्यास विसरूनी । शेवटीपरिणाम बरवेपणीं । न दिसे की ॥७॥ येतीयमाजीची चिठी । जीवाजीसी धरूनी उठाउठी । नेतील जेव्हा शेवटी । मग दु:ख वाटेल की ॥८॥ __ हे अवघे रहाती एकीकडे । जीवाजीसी पडेलकोडें । पायी ठोकतील खोडे । मग रडो लागतीलकी ॥९॥ एका जनार्दनी म्हणे । सावधपणे तुम्हीरहाणें । जन्ममरणाचें पेणे । चुकवावें की जीमायबाप ॥१०॥
