वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079573 · अभंग क्र. ३८८५

3885.
(बाळक्रीडा अभंग)
ये दशे चरित्र केले नारायणे । रांगता गोधने राखिताहे ॥१॥
हे सोंग सारिले या रूपे अनंते । पुढेहि बहुत करणे आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे । केला नारायणे अवतार ॥३॥

अर्थ :
अशा प्रकारे कृष्णाने रांगत असल्यापासून ते गाई रक्षण करण्यापर्यंत विविध प्रकारचे चरित्र केले. नंतर देवाने गोपाळाचे सोंग देखील बाजूला सारले कारण देवालापुढे खूप मोठे मोठे काम करायचे होते. तुकाराम महाराज म्हणतात, खरे तर नारायणाने धर्मसंस्थापना करण्यासाठीच अवतार घेतलेला होता.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग