अर्जाचा जाब ३८५४
3854.
अर्जाचा जाब ३८५४
क्षत्रीय कुळवंत । श्री अयोध्याधीश । राजाराम छत्रपती अनंत ब्रह्मांड निवासी राजे । श्रीजीवाजीपंत शेकदार । मौजे देहगांव । तालुकेअष्टपुरी । मामले पांचाळेश्वर । यासी आज्ञापत्र । मौजेमजकूराचा वाका लिहून कळविला । तेथे लिहिलेकी मनाजीराव देशमुख । हे असुरी सेनापुंडपाळेगारमिळुन गाव मारीतात । वसाहत होऊ देत नाहीत । ब्रह्मपुरीचा मार्ग चालु देत नाहीत । असेअसल्याकारणाने तुम्हावर साहेबांची मेहेरबानीहोऊन । मनाजी देशमुख याजला तबीबपोहोचावयास । सरकारातून सुभे रवाना झाले । बितपशील कलम । आत्मा विवेक । प्रधानस्वानुभव । सैन्याधिपति प्रबोध । सरलष्कर इतरावैर सनदा देऊन । ताबडतोब रवाना केले आहेत । तर हे मौजे मजकुरी पावतांच । अवघे पुंडपाळेगारठार मारतील । ब्रह्मपुरीचा मार्ग चालू लागेल । याजकरितां तुम्ही आपली खातरजमा राखुन । साहेब कामास रुजु राहणें । केलेली सेवा तुम्हांसमजुरा आहे । तर आपण हुजुर झाल्यास । 'बंधमोक्षांतीक इनाम दिला जाईल । आपणासह पूर्णनिजानंदी रंगुन साहेब कामास तत्पर असणे । एकाजनार्दनी शरण । बहुत काय लिहिणे
