वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079435 · अभंग क्र. ३८७२

3872.
(बाळक्रीडा अभंग)
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणी ॥१॥
लोटांगणी आले होऊनिया दीन । मग नारायण म्हणे भले ॥२॥
भला आजि तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥
लागती चरणा सकळ ते काळी । आम्हामध्ये बळी तू चि एक ॥४॥
एका तुजविण न यो आम्ही कामा । कळो कृष्णा रामा आले आजी ॥५॥
आजिवरी आम्हा होता अभिमान । नेणता चरणमहिमा तुझा ॥६॥
तुझा पार आम्ही नेणो नारायणा । नखी गोवर्धना राखियेले ॥७॥
राखियेले गोकुळ आम्हा सकळांसि । दगडाच्या राशी वरुषता ॥८॥
वर्णावे ते काय तुझे महिमान । धरिती चरण सकळिक ॥९॥
सकळ ही तान विसरली भूक । सकळ ही सुख दिले त्यांसि ॥१०॥
त्यासि कळो आला वैकुंठनायका । तुका म्हणे लोक निर्भर ते ॥११॥

अर्थ :
भगवंताने एकट्यानेच आपल्या करंगळीच्या नखावर गोवर्धनगिरी उचललेला पाहून सर्व गोपाळांचा अभिमान टाकून देण्यास देवाने भाग पाडले व सर्वांना आपल्याला शरण येऊन लोटांगण घालीत येण्यास भाग पाडले. सर्वजण दीन होऊन देवाला लोटांगण घालीत शरण गेले त्यावेळी नारायण म्हणू लागला, आज तुम्ही खरोखरच मोठा पराक्रम केला आहे गोवर्धनगिरी पर्वत तुम्ही उचलला आहे. देवाने असे म्हटल्यावर सर्व गोपाळ कृष्णाच्या चरणी लोटांगण घालीत म्हणू लागले की, देवा तूच एक आमच्यामध्ये बलवंत आहेस. हे कृष्णा रामा आम्हाला हे आता चांगलेच कळून आले आहे की, तुझ्यावाचून आम्ही कोणाच्याही कामी आलो नसतो. देवा आजपर्यंत आम्हाला आमच्या शक्तीचा व आमच्या देहाचा अभिमान होता परंतु खरा तुझा चरणमहिमा आहे तो आम्हाला माहितच नव्हता. हे नारायणा आम्हाला तुझ्या महिमेचा अंत:पार माहित नव्ह

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग