वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079544 · अभंग क्र. ३८७८

3878.
(बाळक्रीडा अभंग)
यांसि समाचार सांगतो सकळा । चलावे गोकुळा म्हणे देव ॥१॥
देव राखे तया आडलिया काळे । देव सुखफळे देतो दासा ॥२॥
दासा दुःख देखो नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळता ॥३॥
नाही मेघ येता जाता देखियेला । धारी वरुषला शिळांचिये ॥४॥
एवढे भक्तांचे साकडे अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
इंद्राने क्रोधित होऊन गोकुळावर अतिवृष्टी केली मग भगवंताने गोवर्धनगिरी पर्वत उचलला व त्या गोवर्धनगिरी पर्वताखाली सर्व गोकुळवाशी राहू लागले, पशु पक्षी राहू लागले नंतर गोपाळांना वाटले की, हा गोवर्धनगिरी पर्वत आम्ही सर्वांनी उचलून धरला आहे असा अहंभाव त्यांच्या ठिकाणी तयार झाला तेव्हा भगवंताने करंगळीच्या नखावर गोवर्धनगिरी पर्वत उचलला आहे हे गोपाळांना कळले त्यावेळी त्यांचा गर्वनाश झाला सात दिवस सर्व त्या पर्वताखाली वास करत होते नंतर कृष्ण्‍ गोपाळांना म्हणाला की, इंद्राने हा अतिवृष्टीचा वर्षाव का केला ते तुम्हाला मी सांगतो चला. ज्यावेळी भक्तांवर संकट येते त्यावेळी देव त्यांची मदत करतो आणि त्यांना सुख फळे देतो. आपल्या दासांना दु:ख झालेले देवाला पाहावत नाही दु:ख होण्याच्या आधी त्या दु:खाचे निवारण देव करतो त्यामुळेच अतिवृष्टीतून मेघ कधी आले आणि कधी गेले व शिळा धारांचा वर्षाव किती दिवस चालला हे सुध्दा कोणालाही कळले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे भक्तांचे येणारे संकट अनंतावर येऊन पडते आणि तोच त्याचे निवारणही करतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग