जोहार मायबाप जोहार ।
3887.
जोहार मायबाप जोहार । मी । सूर्यवंशीचा महार । सारा गांवचा करितो कारभार । सावध ऐका की जी मायबाप ॥१॥ गांव भरिलापांचांनी । पंचवीस जाहलें धनी । आपुलाले गुंतलेव्यसनी । गेले विसरून धन्यासी की ॥२॥ धन्याने हवाली गांव केला । विसर त्याचा त्यासीत्यास पडिला । शेवटी यमाजीबावाचा टोला । गांडीवर बसेल की ॥३॥ गांवांत वस्ती भरपूरआहे । तंववर तुम्ही हित आपुलें पहावे । जराआलिया उपाय । काही न चाले की ॥४॥ डोळेगांवची लागती कवाडे । नाकापूरीं शेबुंड पडे । तोंडापुरची बत्तीस खेंडें । वोस पडतील की ॥५॥ मानगांव डगमगेल । पोट गांव पाठीस लागेल । ढोपरपूरचा मणका मोडेल । ऐशी फजीती होईलकी ॥६॥ दोन्ही टिऱ्या वाळून जातील । गांडापूरबदबदा वाहील । लिंगाची तो गडबड होईल । मेल्या कुतऱ्यासारखी की ॥७॥ गुडघेगांवचे मेटेमोडती । पायगांव चालू रहाती । हातापूरे वळूनजाती । काय उपाय तेथे की ॥८॥ ऐशी गांवचीगडबड जाहली । ती पाहून मला दया आली । मग म्या काढून रसायन वल्ली । अबादी केलीगांवची की ॥९॥ भक्तिचा करूनी काढा । तयासीदिधला धडफुडा । नामस्मरण निकाढा । उतारादिला की ॥१०॥ एका जनार्दनी शरण । दिव्यउतरून रसायन । छेदूनिया भवांचे बंधन । वैकुंठीवास करविला की जी मायबाप ॥११॥
