वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079876 · अभंग क्र. ३८९१

3891.
(बाळक्रीडा अभंग)
वाया तैसे बोले हरीसी अंतर । केले होती चार भयभेदे ॥१॥
भेदभय गेले नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा झाली ॥२॥
झाली भेटी कंसा हरीशी निकट । सन्मुखचि नीट येरयेरा ॥३॥
येरयेरा भेटी युद्धाच्या प्रसंगी । त्याचे शस्त्र अंगी हाणितले ॥४॥
त्याचे वर्म होते ठावे या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥

अर्थ :
जर आपल्या अंत:करणामध्ये भेद आणि भय या दोन गोष्टी असल्या आणि आपण कितीही चार ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तरी त्या व्यर्थ ठरतात कारण या गोष्टीमुळे हरी आपल्यापासून अंतरतो. ज्यावेळी कंसाच्या मनातून भेद आणि भय नाहीसे झाले व स्वत:लाही तो विसरुन गेला त्यावेळी नारायणाची कंसाला भेट झाली. मग कंसाला हरीची भेट त्याच्या अगदी समोरच, त्याच्याजवळच झाली. युध्दाच्या प्रसंगी दोघाचीही समोरासमोर भेट झाली त्यावेळी कृष्णाने कंसाच्या शरीरावर खड्गाचा वार करुन त्याचा नाश केला. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सत्ताधीश असा जो अनंत त्याला कंसाच्या नाश करण्याचे खरे वर्म माहित होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग