(बाळक्रीडा अभंग)
3857.
(बाळक्रीडा अभंग)
नेणे वर्ण धर्म जी आली सामोरी । अवघीच हरी आळिंगिली ॥१॥
हरी लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥
पारणे तयांचे झाले एक वेळे । देखिले सावळे परब्रम्ह ॥३॥
ब्रम्हानंदे लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरी ॥४॥
घरोघरी सुख आनंद सोहंळा । सडे रंग माळा चौकदारी ॥५॥
दारी वृंदावने तुळसीची बने । रामकृष्णगाणे नारायण ॥६॥
नारायण तिही पूजिला बहुती । नाना पुष्पयाती करूनिया ॥७॥
यांचे ॠण नाही फिटले मागील । पुढे भांडवल जोडिती ही ॥८॥
ही नव्हती कधी या देवा वेगळी । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥
सेवाॠणे तुका म्हणे रूप धरी । भक्तांचा कैवारी नारायणा ॥१०॥
अर्थ :
यमुनेच्या डोहातून वर आल्यानंतर हरीला भेटण्यासाठी आलिंगन देण्यासाठी जी लोक हरीसमोर आले त्यांच्या वर्णाचा व धर्माचा काही विचार न करता सारख्याच भावनेने हरीने सर्वांना आलिंगन दिले. नंद, यशोदा सर्व लोकांसोबत हरी गोकुळ नगरात आले. सावळे परब्रम्ह पाहून सर्वांच्या डोळयांचे पारणे फिटले. ब्रम्हानंदाच्या छंदामध्ये सर्व लोक नाचत होते व घरोघरी आनंदाच्या गुढ्या उभारत होते. घरोघरी सुख सोहंळा व आनंद साजरा करण्यात येत होता प्रत्येकाच्या दारात, प्रत्येक चौकामध्ये विविध प्रकारच्या रांगोळया काढण्यात आल्या होत्या. दारोदारी तुळशीची वृंदावने व सर्वत्र तुळशीची रोपे लावण्यात आली होती व प्रत्येकजण रामकृष्ण नारायण असे गाणे गात होता. खूप प्रमाणात फुले आणून नाना प्रकारची फुले आणून नारायणाची त्यांनी पूजा केली. त्यांचे मागचे देवावरील असलेले ऋण कुठे फिटले नाही तोच त्यांनी पुढेही सेवारुपी
