वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079609 · अभंग क्र. ३८६७

3867.
(बाळक्रीडा अभंग)
वेडावली काय करावे या काळी । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥
गोवर्धन धरू शिरी उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊ नका ॥२॥
नका सांडू कोणी आपला आवांका । मारिता या हाका आरोळिया ॥३॥
अशंकित चित्ते वाटे त्या खरे । धाकेंच ते बरे म्हणती चला ॥४॥
चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊ नेदी ॥५॥

अर्थ :
सर्वच्या सर्व लोक अतिवृष्टीने फार वेडावून गेले होते यावेळी काय करावे, त्यावेळी वनमाळी श्रीकृष्ण्‍ गोपाळांना म्हणाला. मी तुमच्या माथ्यावर आसरा म्हणुन गोवर्धन पर्वत उचलून धरेन तुम्ही कोणीही भिऊ नका. अहो तुम्ही विनाकारण कुणालाही हाका मारु नका, आरोळया देऊ नका व आपले धैर्य सोडू नका. सर्व लोक आशंकित मनाने कृष्णाकडे पाहू लागले व हा एवढासा कृष्ण्‍ एवढा मोठा गोवर्धन पर्वत कसा उचलून धरील असा विचार करु लागले परंतु अतिवृष्टीच्या धाकाने सर्व लोक भयभीत झाले होते नंतर सर्व लोक म्हणू लागले बरे चला. तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळांच्या चित्तामध्ये अतिवृष्टीचा धाक तर होताच परंतु त्यांच्याजवळ अनंत होता त्यामुळे तो कोणाचाही घात होऊ देणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग