का रे महारा मदमस्ता
3863.
का रे महारा मदमस्ता । का होब्राह्मणबाबा भलतेच बोलता । तुझे बापाचे भयकाय । मायबाप तुमचे आमचे एकच हाय । एकऐसें बोलू नको । निर्गुणापासून अवघे झालो । निर्गुण तुला काय ठावे । आत्मस्वरूपी शोधूनपहावे । आत्मस्वरूप आम्हा कळेना । नाही तरीसंतांशी शरण जाणा । संतांशी शरण गेल्याने कायहोते । चौऱ्याऐंशीचा फेरा चुकतो । हे ज्ञान तुलाकोणापासून प्राप्त झाले । एका जनार्दनी प्रसादें कळूआले ॥१॥
