वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 232. अभयपत्र ३८५५

अभयपत्र ३८५५

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086858 · अभंग क्र. ३८५५

3855.
अभयपत्र ३८५५

समस्त राजकार्यधुरंधर । विश्वासनिधी । राजमान्य राजश्री । गजानन पंडित । द्विमतअपर्णाकांता । तालुके कैलासगिरी । तहाजी बाजीशेकदार । परगणे कर्म आचरण । सरकार ब्रह्मांडनगर । लोली प्रवाहे । अभयपत्र दिधले की । तमचेबाबे विवेक देसाई येऊन हुजूर विदित केले की । दक्षिणाधिपति राजश्री यमाजीपंत कमाविसदार । यांचे धास्तीनें तमाम गांवची कीर्द बुडाली । त्यासयेरवी पूर्वी । संपूर्ण तीर्थव्रतें । जप अनुष्ठानें । दानादिकेलीं । परंतु गांवची कीर्द अबादी होईना । यास्तवअभयपत्र । सादर केले की । त्रिकुटाचल शिखरीं । भ्रमरगुंफा सिंहासनी । श्रीगुरुराव आहेत । त्यासीशरण जाऊन । आता ज्ञानाची विचारणा करावी॥म्हणजे श्रीगुरुराव । नामाचे निशाण देतील । तेंदेहगांवचे मुख्य चौबारा उभारा । कामक्रोधादिकषड्वैरी । आपणावर दगा करितात । तरी त्यांचीपाळद राखून । इकडे निरोप कळवावा । म्हणजेत्यांशी धरून आणून । त्यांचा शिरच्छेद करावयासयेईल । परंतु लिहिल्याप्रमाणे वहिवाट करावा । म्हणजे आम्ही सरकारांत अर्ज करू । ज्ञान वैराग्यहुजरे । आपले रखवालीस पाठवू । कळावें एकाजनार्दना शरण । हा आशीर्वाद हे अभयपत्र ॥१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग