जोहार मायबाप जोहार ।
3880.
जोहार मायबाप जोहार । वेसराख्याचा धंदा । स्वरूपी सावध होतो सदा । घरीहुनी फाकू नका की जी मायबाप ॥१॥ विषयाच्या गलबली गुंतू नका । बहुत बाकी वाहूनका । दांडोरा पिटीये सारखा । बाकी झाडा कीजी मायबाप ॥२॥ भावभक्तिधरा कुळवाडी । चित्तांतून काढा अविद्येची पिंडी । नाही तर पडेलप्रपंचाची बेडी । तै नंतर बहु दु:ख होईल की जीमायबाप ॥३॥ तेणेंदु:खें विवळू लागाल । आपलेमायबापासी बोलावू जाल । घरसंसार भोगूलागालऐसें बाकीचें फळ की जी मायबाप ॥४॥ महारबोले म्हणूनी जाल गर्वे । स्वहित होईल ते कराबरवें । बापांनो डोळे झाकू नका की जीमायबाप ॥५॥ डोळे झाकून ठेवाल बाकी । तरीकाळाची धरणी होईल निकी । जरी जाली मायसखी । तरी कोण सोडवील की जी मायबाप ॥६॥ जो वेसराख्याचे मिळणी असे । त्यासी दुजेपणाचाधाक नसे । सद्गुरूचरणीं विश्वासे । आपुलें मुळटाकावें की जी मायबाप ॥७॥ एका जनार्दनींवेसराखा । तेणे चुकविला जन्ममरणाचा आडाखाजरी आत्माराम होय सखा । त्याचे चरणी वस्तीकी जी मायबाप ॥८॥
