विनंतीपत्र ३८५०
3850.
विनंतीपत्र ३८५०
श्रीमंतमहाराजराजमान्य सकल गुणसंपन्न । सकळ वेदसंपन्न । शास्त्रसंपन्न । आत्मारामपंत वास्तव्य देह शहर । चरण सेवेसी । जीवाजीचा साष्टांग नमस्कार आपण कलमीं पत्रदर्शविलें त्याप्रमाणे गावची वहिवाट चालूच आहे । मध्यंतरी गावची रयत नायकेल तर इलाज नाही । ज्याचे ते आपआपले धर्माप्रमाणे वागतात । पुराणश्रवण मनन । निदिध्यास अर्चन । वंदन । दास्यत्त्व । पादसेवन । हेही आपआपल्या धर्माप्रमाणे चालूआहेत । यांत अधर्म कोणता होईल तो साहेबांसलिहून कळवू । एका जनार्दनी शरण हेविनंतीपत्र ॥१॥
