(बाळक्रीडा अभंग)
3860.
(बाळक्रीडा अभंग)
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तया भेऊ नका ॥१॥
नका धरू भय धाक काही मनी । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥
गौळियांसि धीर नाही या वचने । आशंकितमने वेडावली ॥३॥
वेडावली त्यास न कळता माव । देवाआदिदेव नोळखता ॥४॥
नोळखता दुःखे वाहाती शिरी । तुका म्हणे वरी भारवाही ॥५॥
अर्थ :
ज्यावेळी इंद्राला अर्पण करण्यासाठी धान्य, दही, दूध, तूप, लोणी गोकुळवासी नेत होते त्यावेळी कृष्णाने ते सर्व त्यांच्याकडून हिरावून घेतले व सांगितले की, तुम्ही त्याला काहीही अर्पण करु नका त्यावेळी कृष्णाला गोकुळवाशी म्हणाले की, कृष्णा तुझा हा खेळ चांगला नाही बर का, जर इंद्र आपल्यावर कोपला तर चांगले होणार नाही त्यावेळी देव त्यांना म्हणाला की, इंद्राला तुम्ही भिऊ नका. गोकुळवाशीयांना चक्रपाणी म्हणतात की, तुम्ही इंद्राचा कुठल्याही कोणत्याही प्रकारचा धाक किंवा भय मनामध्ये बाळगू नका तो आपल्याला काहीही देत नाही आपल्याला जे काही मिळते ते गोवर्धन पर्वताच्या माध्यमातूनच मिळते तुम्ही शेतात चांगले कष्ट करतात त्यामुळे शेतात तुम्हाला धान्य मिळते गोवर्धन पर्वतावर गवत उगते म्हणून गाई ते गवत खातात व दूध देतात आणि गोवर्धन पर्वतावरच नद्यांचा उगम होतो त्याच नद्यांचे सुर्यकिरणाव्दारे ढग तयार होऊन पाऊस पडते त्यामुळे इंद्राला काहीही देण्याची गरज नाही. परंतु गवळयांना कृष्णाच्या बोलण्यावर काही विश्वास बसेना आणि एवढे मोठे धैर्य करण्याचेही त्यांना जमेना आशंकित होऊन त्यांचे मन वेडावले होते. कृष्ण् देवाचा देव आहे हे त्यांना ओळखता आले नाही केवळ मायेचा पडदा
