जोहार मायबाप जोहार ।
3873.
जोहार मायबाप जोहार । मी तोएकनाथ महार । लहानसा महाराचा पोर । माझेबोलण्याचा विचार । दुसरा नाही की जीमायबाप ॥१॥ माझ्या बोला ऐकीजे । मोठ मोठेउमराव राजे । तुम्हीच का जीवाजी न जाणिजे । वेळेस संदेह धरिता की ॥२॥ चैतन्य चावडीचामहार । की जी मिराशी महार । जेंव्हां नव्हतागांवचा आवार । मज ओळख नाही की ॥३॥ कायापूरचा अचाट पाया । यमाजी झाले बेहया । त्यापुढे पाहती पळाया । मनाजी संगे मिळालेखाया । परी नाही वाट की ॥४॥ दहा गुरे बाहेरदिसती । पांच गुरे अंतर असती । इतुकीं आवरीअवचिती । नाही तरी खोडा पडसी की ॥५॥ बाराजणे फुगवितील गाल । शेवटी तुम्हीच बांधिलेजाल । तुमचे होतील बेताल । तेंव्हा तुम्हांस कोणसोडवील की ॥६॥ सारे कडेचे पोहणार । दहाआणि पांच पोर । एकनाथ करितो जोहार । अक्कल धरा की जी मायबाप ॥७॥
