वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079515 · अभंग क्र. ३८७३

3873.
(बाळक्रीडा अभंग)
लोका कळो आला देव आम्हामधी । टाकिली उपाधि तिही शंका ॥१॥
शंका नाही थोर लाहाना जीवांसि । कळला हा हृषीकेशी तेंव्हा मग ॥धृपद॥
मग झाले निर्भर सकळ । संगे लोकपाळ कृष्णाचिया ॥२॥
कृष्णाचिया ओंव्या गाणे गाती गीत । कृष्णमय चित्त झाले त्यांचे ॥३॥
त्यांसि ठावा नाही बाहेरिल भाव । अंतरींच वाव सुख झाले ॥४॥
सुखे तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥५॥
चिंतने चि धाली न लगे अन्नपाणी । तुका म्हणे मनी समाधान ॥६॥

अर्थ :
लोकांना कळून आले की, देव आपल्यामध्येच वावरतो आहे व त्यांनी सर्व उपाधी व शंका टाकून दिली. ज्यावेळी लोकांना कळले की, कृष्ण्‍ म्हणजे भगवान विष्णूच आहे त्यावेळी गोकूळातील लहानथोर व्यक्तींना कृष्णाविषयी कोणत्याही प्रकारची शंकाच राहिली नाही. मग कृष्णाच्या बरोबर सर्व लोक आनंदीत झाले. ते सर्व लोक कृष्णाचे गाणे, ओव्या गीत गात होते म्हणून त्यांचे चित्त देखील कृष्णमय झाले होते. त्यांचे अंत:करण सुखी झाले होते त्यामुळे त्यांना बाहेरील काहीही कळत नव्हते. त्या सुखापुढे त्यांना दिवस आणि रात्र काहीही कळत नव्हते त्यांच्या अंत:करणात अखंड गोविंदाची ज्योत पेटलेली होती. तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या चिंतनानेच ते तृप्त झाले होते त्यांना अन्नपाणी याची काहीही गरज लागत नव्हती आणि मनानेही ते अगदी समाधानी झाले होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग