वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079564 · अभंग क्र. ३८७९

3879.
(बाळक्रीडा अभंग)
काकुळती एके पाहाती बाहेरी । तया म्हणे हरी वोसरला ॥१॥
वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥
कवतुक जाले ते काळी आनंद । कळला गोविंद साच भावे ॥३॥
भावे तयापुढे नाचती सकळे । गातील मंगळे ओंव्या गीत ॥४॥
गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाहाती पावे ॥५॥
वत्से गाई पशू नाचती आनंदे । वेधलिया छंदे गोविंदाच्या ॥६॥
चित्त वेधियेले गोविंदे जयाचे । कोण ते दैवाचे तयाहुनि ॥७॥
तयाहुनि कोणी नाही भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥
गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥

अर्थ :
इंद्राने ज्यावेळी अतिवृष्टी गोकुळावर केली त्यावेळी सात दिवस सर्वजण त्या गोवर्धनगिरीच्या खाली होते पाऊस ओसरला की नाही हे पाहाण्यासाठी काही गोपाळ भित भित बाहेर पाहू लागले तर त्यावेळी हरी म्हणाला, आता भिऊ नका पाऊस ओसरला आहे. मग पाऊस ओसरलेला पाहून सर्वजण म्हणू लागले की, हा पाऊस जणू आपल्यासाठी काळच होऊन आला होता मग सर्वजण गोवर्धनाच्या बाहेर आले. त्यावेळी सर्वांना कौतुक झाले, आनंद झाला गोविंद ख-या भावनेने सर्वांना कळला. भक्तिभावपूर्वक सर्व लोक कृष्णापुढे नाचू लागले व मंगलकारक ओव्या, गीत सर्व लोक गाऊ लागले. सर्वजण राम, कृष्णावर ओव्या गात होते व गोपाळ मुरली, पावा वाजवत होते. गाई, वत्स, पशु, पक्षी हे गोविंदाच्या छंदाने आनंदीत झाले होते व त्या छंदात नाचत होते. गोविंदाने ज्याचे चित्त वेधून टाकले आहे त्याच्यापेक्षा दैववान, भाग्यवान दुसरा कोण आहे ? गोविंद ज्यांच्याशी अखंडीत संगतीत आहे त्याच्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोणीही नाह

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग