वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079424 · अभंग क्र. ३८८३

3883.
(बाळक्रीडा अभंग)
समागमे असे हरी नेणतिया । नेदी जाऊ वाया अंकितांसि ॥१॥
अंकिता सावध केले नारायणे । गोपाळ गोधने सकळही ॥२॥
सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसी सकळांच्या ॥३॥
सकळांचा केला अंगीकार देवे । न कळता भावे वाचवी त्या ॥४॥
त्या जाला निर्धार हरी आम्हापासी । निवांत मानसी निर्भर ती ॥५॥
निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळिक नारायणे ॥६॥
नारायण भय येऊ नेदी गांवा । तुका म्हणे नावा अनुसरे त्या ॥७॥

अर्थ :
जो हरीला अंकित आहे आणि त्याला कसल्याही प्रकारचे ज्ञान जरि नसले तरी देखील हरी त्याला वाया जाऊ देत नाही. नारायणाने आपल्याला अंकित असलेल्या सर्व गाई वासरांना व गोपाळांना सावध केले. इंद्राने अतिवृष्टी केली व सर्वजण सात दिवस त्या गोवर्धनगिरीच्या खाली उभे होते त्यानंतर पाऊस ओसरल्यावर सर्वजण गोकुळात पुन्हा आले व कृष्णाने या मोठया संकटातून आपल्याला वाचवले याचा आनंद त्यांच्या मनात झाला. भगवंताने कृष्णाने सर्वाचा अंगीकार केला अतिवृष्टीचा कोणताही त्रास गोकुळवाशीयांना देवाने जाणून दिला नाही व त्यांचे प्राण वाचविले. त्या सर्व गोकुळवाशीयांची खात्री झाली की, हरी आमच्याजवळच आहे त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये आनंद निर्माण होऊन सर्वजण निश्चिंत झाले होते. गोकुळातील सर्व लोकांना नारायणाने आनंदीत केले. तुकाराम महाराज म्हणतात, जो नारायणाच्या नामाला अनुसरतो त्याच्या गावाला भय देखील नारायण येऊ देत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग