जोहार मायबाप जोहार ।
3886.
जोहार मायबाप जोहार । पाटीलपांडे जोहार । देसाई देशमुख जोहार । की जी येसरदार । कोंडून राखीले की जी मायबाप ॥१॥ उघडा उघडा नेत्रांची ब्रह्मकवाडें । ऐका धर्मरायाचेंप्रमाण निवाडे । जेणे चुकेल जन्ममरणाचें सांकडें । इमारतीची लाकडें । रानोमाळ होतील की ॥२॥ खडी फरस धर्मराज खरा । तेणे कलुशा मारूनकेला चुरा । माझे धन्याचे घरा । कधी मधींयेत जाकी ॥३॥ आकाबाई सावकारीण मोठी । कायापूरनगरी केली खोटी । तिने तर पाडिली भल्याचीतुटी । तेथे तुमचे काय चालें की ॥४॥ व्याहीजांवयासी म्हणे लेकरा । त्यासी वाढिता तुपसाखरा । मला देखून लपता येकसरा । अंतकाळीचाकर मीच की ॥५॥ जांवयासी वाढी तूप लई । मला म्हणता उरले नाही । घर बुडाले याच पायी । प्रत्यक्ष ग्वाही मीच की ॥६॥ सकळ कोणी जाऊंनका । मागील बाकी ठेऊ नका । नाहाक एखादा 'धका । बसेल की ॥७॥ अविद्ये खिडकी वाटेगेला । तो यमदूतें धरोनी नेला । लक्ष चौऱ्याऐंशीमारथी मारथिला । आइका की ॥८॥ झाडालबाकी तर तुम्ही व्हाल सुखी । हे सत्य तिही लोकी । झेंडा नौबद लावा निकी की ॥९॥ एका जनार्दनी 'महार बोले । म्हणून नका जाऊंगर्वे । मारिता अंगहोईल हिरवें । सांगतो बरवे की जीमायबाप ॥१०॥
