(बाळक्रीडा अभंग)
3888.
(बाळक्रीडा अभंग)
द्वेषाचिया भावे हरीरूप झाले । भाव हारपले देहादिक ॥१॥
देहादिक कर्म अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥
नारायण जोडे एकविध भावे । तुका म्हणे जीवे जाणे लागे ॥३॥
अर्थ :
कंस व्देष भावनेने श्रीकृष्णाचे ध्यान करु लागला व तो देखील हरीरुप झाला त्याचा देहभाव नाहीशा झाला. कंसाचा देहाभिमान नाहीशा झाला होता देह भावना ठेवून कर्म केले तर त्यापासून अभिमान वाढत जातो मग त्याला नारायणाची प्राप्ती होईल कशी ? तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाविषयी एकविध भक्तिभाव आपल्या अंत:करणामधे असावा आणि आपला जीव भाव देवाला अर्पण करावा.
