जोहार मायबाप जोहार ।
3892.
जोहार मायबाप जोहार । माझे नांवआत्मनाक महार । माझा जालीम कारभार । धन्याचें रजेने करतो की जी मायबाप ॥१॥ ममताई आवा पाटलीण मोठी । थोरा नायकाचीबेटी । मनाची निर्मळ नोहे खोटी । लक्षलक्षापतीयेती तिचे भेटी की ॥२॥ मानभाव जती सती । तडी तापडी अपार मती । माझे धन्याचे घरा येती । धन्यावर जोर जप्ती करू पहाती की ॥३॥ दोघेकारभारी जोड यांची 1 मोकाशी म्हणवितीसृष्टीची । तिही वस्ती केली वरच्या गांवीची । खबरघ्यावया खालील गांवठाण्याची । मज रवाना केलेकी ॥४॥ झडूनी पडली गळा । तुकडा दिलापाकशिळा । याबद्दल तुमचे स्थळां । आलोकी ॥५॥ शिव शेटियासी जोहार । जीवाजीचौंगुल्यासी जोहार । वैष्णव कुळकर्णी यासीजोहार । तुमचा कारभार जड दिसतो की ॥६॥ सारी पांढर ओस पडली । थोर थोर कुळे दुर गेली । नवद्वारें कैसी नागविली । संतती आपुलें पोटी पुरतीकी ॥७॥ हुजुर धन्यास राग जाईल फार । मोठेधाडतील वरातदार । इज्जत घेतील करतीलकहार । मग वारंवार आठव होईल की ॥८॥ नेऊन घालतील बंदीखानीं । तेथे सोडावयां नाहींकोणीं । अविद्या मारील हालहाल करूनी । हीफजीती सरेना की॥९॥यमाजी बाजी हुद्देदार । त्याचा तो जीवावरील मार । जों घडला नाही हाविचार । तो दरबार शुध्द करा की ॥१०॥। पंचवीस कुळे धरा बिगारी । गांवातील जमीनवजवा सारी । गजगिरी करा नवद्वारी । धन्याचीनिशाणी लावा की ॥११॥ महामूर करा पेठा चारी । चौमहाजनांसहीत श्रीपाद घ्या वरी । धन्याचेनांवाचा कौल शिरी । साच चढवा की ॥१२॥ अक्षय वास एक चित्त करा । फळावर फिटेल सारादोरा । पहिल्याखतासी दूर करा । नाही तरी कानीउबा पडेल की ॥१३॥ ब्रह्माजी पाटील यासीसांगा जोहार । पाटलीण आवाचा बेजाजा जालाफार । अवघा गावगुंडी कारभार । आवाजी करितीकी ॥१४॥ आवाजीची साच वेसन खोटी । राबती करा संदेह रोटी । सहज कारभाराचीआटाआटी । मज नफरासी उजवे दिठी । पाहु नकाकी ॥१५॥ कामधामाचा उल्लंघ करितो । आल्यागेल्यासी जबाब देतो । साऱ्या रयतेची घरेंराखितों । हे कष्ट सान की जी मायबाप ॥१६॥ कितीकांसी लांकडे द्यावी । शिंग शिंगुटी म्यांचपुरवावी । फजिती राबणुकीची सोसावी । हीगोष्टसान की ॥१७॥ मेखा पायबंद तोबरें माथा । जीव कष्टला बिगारी वहातां । चौऱ्याऐंशी लक्षगांवें हिडतां । हे दु:ख सान की ॥१८॥ कुळवाडीथोटपणाशी आले । बलुते देईनासे झाले । पांढरटाकुनी पळाले । तरी मिराशीचे लिगाड की ॥१९॥ नहोईना मातीचा पेंडुळा । जनोबाखायाचा मायंदळा । रजा घेऊनि पूर्वस्थळा । जाईन की ॥२०॥ मिरास सर्वस्व कळली । पाटलीण आवा धनीण जाली । दिवाणदाराचीतोंडे मारली । तेथे आमुचा पाड काय की ॥२१॥ मिरास सर्वस्व कळली सारी । हाक घेऊनी जाईनगडावरी । रामजी बावाचें दरबारी । हकीकत सारीसांगेन की ॥२२॥ कोणी म्हणतीं देऊं लांचा । मी नव्हे आजकालचा । झाला वृत्तांत साचा । तोवडीलासी सांगेन की॥२३॥खाली गांवी पाटलीणआवा विवसी । ती अलिंगून दे साहेबासी । सारेम्हणती मोकासी । आम्हांस तिजपाशीं कांधाडितांकी ॥२४॥ पांचजण लहान लहान पोरे । तेअडकती पडती नवा द्वारे । साहेबाचें नाम सारें । स्वप्नी न घेती की ॥२५॥ दोघे तिघे ब्राह्मणमेळविली । तेणे परमुलखाची रांडोळी केली । धन्याचें नांवांची निशाणी उरूं दिली नाही की॥२६॥पाटीलबोवा स्वप्नीं गुंतले । कारभारटाकुनी लाजिरे जाले । जोगी मोकासी होउनि गेलेया ममताई आवाच्या भेणे की ॥२७॥ आणिकमेळविलें दैवते । खबर सांगों आलो साहेबातें । घरोघर पुजिती भूते । त्यांची नांवे ऐका की ॥२८॥ वासना मांगीण मातंगिणी । कामना जळीमायराणीं । अभाव भांगड भूत जोगीनी । त्यासीनग्न पूजिती की ॥२९॥ वीर झोटींग नरसिंगवेडा । वेताळाचा पुजिती खोडा । शेढुंर माखोनियांधोंडा । शेळी बोकड जीवघेती की ॥३०॥ मेल्यामनुष्यासी पुजिताती । खोड सुपल्या पाळणेबांधीती । गळ टोचोनि बागडे घेती । ही फजीतीसान की॥३१॥जीवदान देऊं करिती । अवघींदैवतें एकची म्हणती । मेंढरें बोकड मारीती । परतोनि आपणची खाती की॥३२॥नैवेद्यनारळनेउनी फोडीती । खोबरें एकमेंकासी वांटिती । नुसती नारोटी देवापुढे ठेविती । लटिके धुप दावूनीचाळविती की॥३३॥जाऊनी देवऋषी आणितीघरा । त्यातून लाविती चुलींतील अंगारा । उफराटेपराचा कोंबडा खैरा । निंब नारळ उताराकी॥३४॥आणिक खपराचें भदाडें । ते चुन्याचेपांढरें लाउनीचहूंकडे । दिवस मावळल्याचे पुढे । तिकटण्यावर ठेविती की॥३५॥दावलमालंकाची पुजीती गदा । वर्षातून फकीर होतीएकदां । मग डोला होता थंडा । खाती मलिंदा हिंदूतुर्काचे खरकटें कीं॥३६॥भेणें भेणे साहेबालास्मरती । त्याला पाटलीण आवाची द्वाही देती । ऐशी मुलखाची गती । ती धन्याप्रती सांगों आलोंकी॥३७॥साहेबाचे हुकुमावर गेलों । प्रवेशपाहुन दंग जालो । वागवेना मग आलो । पायपुसाजवळ की॥३८॥मग धन्यांचे मजआत्मनाकाला । भाग भागला म्हणोनि हुंकार केला । येथे राहे म्हणती की॥३९॥ऐशी निर्धारी केली । बांडी सान घोंगडी दीली । दिठी देऊनीसांगितली । नजरे वेगळा राहू नको की॥४०॥जाऊनी जनार्दन बावाचे दरबारी । राहीलोएकनाथ परचारी । जुगानुजुगाची चाकरी । कोण्हीदूर करी ना की जी मायबाप॥४१॥
