कौलपत्र ३८५८
3858.
कौलपत्र ३८५८
चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार । यासीआत्मारामपंत कमाविसदार । कसबे ब्रह्मपुरी । आशीर्वाद उपरी । तुम्हांस देहगांवचे ठाणे दिल्हेंआहे । तर ठाण्यांत सावधपणे वर्तणूक करणे । तेथे ममताई पाटलीण । तिने लटिकेंच दंभ उभेकेलें आहे । कामक्रोधादि षड्वैरी चाकर ठेवून । लोभमोहाचे फांसे सिद्ध करून ठेविले आहेत । म्हणून तुम्हांस सूचना मात्र लिहिली । विषयाचालोभ न धरणे । निजहितासी अंतर न करणे । सत्य मिथ्या जाणोन । विचाराची वाट धरणे । अविचारपणा सोडून देणे । विवेक सद्भाव यांसीमित्रत्व विशेष असूं देणे । त्याचे बुद्धीने गांवचीलावणी करणे । उत्तम चार वर्णास कौल देऊन । धैर्याचा नांगर धरून । शेतांमधील खडे काढून । वासनेच्या पालव्या तोडून । संशयाच्या काशागोळा करून । भूमिका शुद्ध करून । मग भक्तिज्ञान वैराग्य तिफनी करून । सद्गुरु मुखी निजबीजपेरणें । तेथे शुद्धसत्त्वाचा मेघ वर्षेल । तेथे सत्याचामाळा घालून । कुतर्क पाखरूं उडवून देणे । जागोजागी विश्वास रक्षण ठेवून । शेतांतील मालअवघाच गोळा करून । समस्त षड्गुणऐश्वर्य बैलजुंपून । अवघा माल खळ्यांत आणून । पुष्कळकाढून । स्वानंदाची रास करणे । तेथे सिद्ध साधकेंमागुते येतील । त्याला भक्तीच्या पायलीनें । अवघाचमाल मोजून देऊन । सहहुजूर ब्रह्मपुरास येणे । सांगितल्या गोष्टींत बाकी ठेवाल तर । चौऱ्यांशीलक्ष योनी फिरणे लागेल । मग पुनरपी तुम्हांवरकोणाचा दस्त लादेल । खरे चालावें जन्ममरणाचीवाट खुंटेल । म्हणून जनार्दन सद्गुरुकृपेचा सागर । तेणे एका जनार्दनी आनंदमय समाधान झाले । द्वैताचा लेश उरला नाही । सच्चिदानंदरूप । प्रत्ययासयेऊन समाधान पावले । हे कौलपत्र ॥१॥
