वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079388 · अभंग क्र. ३८९६

3896.
(बाळक्रीडा अभंग)
मारिले असुर वाढल्या मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥
तया नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥
वारीले ते दूती यमाचिया दंडी । नुच्चरिता तोंडी नारायण ॥३॥
नारायण नाम नावडे जयासि । ते झाले मिरासी कुंभपाकी ॥४॥
कुंभपाकी सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥

अर्थ :
जे असुर दुसर्‍यांना पीडा देत होते व ज्यांच्यामुळे पृथ्वीला भार झाला होता अशा असुरांना कृष्णाने मारले होते. जे असुर संतांचा मत्सर करत होते व संतांचा घात करण्यास टपलेले होते अशा असुरांना नारायणाने अघोर अशा नरकाकडे पाठवले. ज्या दुष्टांनी नारायण नामाचा उच्चार देखील आपल्या तोंडानी केला नाही त्यांना नारायणाने मारुन यमदूताच्या हाती शासन करविले. ज्यांना नारायण नाम आवडत नाही ते कुंभीपाक नरकाचे वतनदार झाले. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक संतांची निंदा आपल्या वाचेने करतात त्यांना कुंभीपाक नरकामध्ये चांगलाच मान भेटतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग