वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 239. जोहार ३८६२ ते ३८९८

मी संता घरचा महार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090445 · अभंग क्र. ३८७५

3875.
मी संता घरचा महार । करितोजोहार ॥धृ.॥ विवेक नाईक मांझे नांव । मीपणआले अंहभाव । पंचभूतांचा वसविला गांव । रस्तेचार ॥१॥ आत्माधनी पाटीलबाबा । मनाजीपाटील चालवी गांवा । बुधोबा शेट्या बळकटरावा । घरांत बसली असे आवा । खेळवि पोर ॥२॥ दहाइंद्रिये नऊ वेशी । रहातों दहावें खिडकीशीं । माझा मीच मुळ मिराशीं । लक्ष संतांचे चरणापाशीं । सांगतो विचार ॥३॥ कौल शतवर्षाचे मुळ । कामाजी देशपांड्या खळ । क्रोध देशमुख सबळ । नेणे सरकार ॥४॥ हिशोब पडेल जमा सरकारी । येईल यमाजीची स्वारी । जीवाजी धरूनीकारभारी । वोस पडेल नगरी सारी । देतीलमार ॥५॥ शेवटी नाही तुमचे धड । पडेलचौऱ्याऐंशीचे कोड । मी तो राहीन एकीकडे । जीवाजी वर पडेल सांकडे । सांगतो सार ॥६॥ आवडी राखा मजवर हेत । मीच करीन तुमचेहित । नामस्मरणी लावा चित्त । एका जनार्दनीविठ्ठल विठ्ठल म्हणत । हाचि निर्धार ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग