जोहार मायबाप जोहार ।
3888.
जोहार मायबाप जोहार । मीदामाजीचा लेकवळा महार । माझे नांव विठु साचार । सारा झाडफेडीचा कारभार । मी करितो की जीमायबाप ॥१॥ मंगळवेढें ठाणे जाण । दामाजीसठेविलें कारभारी नेमून । गांवचा वसूल साराकरून । मज नफरा पाठविले की ॥२॥ जोहारजी जोहार । मी लेकवळा विठू महार । दामाजीमजवर प्यार आहे की ॥३॥ दुष्काळ पडलाजाणोन । शिल्लक पेवें दामाजीने विकुन । चिट्ठीपैका घेऊनी जाण । आलो की ॥४॥ दामाजीपरम स्नेहाळू । त्याचा मज कळवळू । चिट्ठीघेऊनी उतावेळू । आलो जवळ की ॥५॥ आलावसूल खतावणी । जमा करा वसूल घेऊनी । बाकीशून्य घालूनीं । जाब द्यावा की ॥६॥ वसूल सारामेळवा । मज लेकवळ्या जाब द्यावा । मै बाकीनठेवा । दामाजी कडे की ॥७॥ मी विठानाकमहार । रहातो पंढरी निरंतर । पहावया आपुलेंनगर । येथवर आलो की ॥८॥ पैका पोंचल्यचीरसद । मज लिहून द्यावी त्वरित । मी जातो जीयेथून की ॥९॥ म्हणोनि केला जोहार । निघालाविठनाक महार । इकडे दामाजीचा विचार । ऐकाकी जी मायबाप॥१०॥प्यादे येऊन जाण । दामाजीस धरती येऊन । बेदरा नेती लगबगेंकरून । तो नवल जाले की ॥११॥ स्नानकरूनि जाण । दामाजी बैसला देवतार्चन । नित्यनेम वाचितां जाण । रसद आंत देखिलीकी ॥१२॥ रसद देखिली पाहता ते वेळीं । बादशहाची मुद्रा देखिली । विठू महारासवें रसदपाठविली । बाकीशून्य जाली की ॥१३॥ एकाजनार्दनीं केला जोहार । मोडिला अविद्येचा थार । व्यापूनियां चराचर । भजनी सादर असावे कीजी मायबाप ॥१४॥
