वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079671 · अभंग क्र. ३८४८

3848.
(बाळक्रीडा अभंग)
भावनेच्या मुळे अंतरला देव । शिरला संदेह भय पोटी ॥१॥
पोटी होते मागे जीव द्यावा ऐसे । बोलिल्या सरिसे न करवे ॥धृपद॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥२॥
अंतरला बहु बोलता वाउगे । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥३॥
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवे । कोण कोणाभावे रडती ती ॥४॥
ती गेली घरास आपल्या सकळ । गोधने गोपाळ लोक माय ॥५॥
मायबापाची तो ऐसी झाली गति । तुका म्हणे अंती कळो आले ॥६॥

अर्थ :
यमुनेच्या डोहात कृष्ण बुडाला हे समजल्यानंतर आपण यमुनेच्या डोहात उडी मारली तर आपले काय होईल हा संदेह आणि भीती प्रत्येकाच्या पोटी उत्पन्न झाला आणि याच भावनेमुळे देव त्यांच्यापासून अंतरला होता. यमुनेच्या डोहात कृष्ण बुडाला हे समजल्यानंतर घरी यशोदा म्हणत होती की, मी आता जाऊन यमुनेच्या डोहातच उडी मारते परंतु प्रत्यक्ष यमुनेच्या तीरावर आल्यानंतर यशोदेला बोलल्याप्रमाणे करणे अवघड गेले. कोणालाही सर्वस्वाचा त्याग व जीवाचा नाश करणे जमले नाही त्यामुळे नारायण त्यांच्यापासून अंतरला होता. खरे तर देव त्यांच्यापासून अंतरला होता कारण हे वरवर खूप व्यर्थ गोष्टी बोलत होते अंत:करणात त्यागाविषयी काहीच भावना नव्हती परंतु केवळ त्यागाच्या वरवर गोष्टी हे करत होते म्हणून. सर्वांच्या गोष्टी हरीने ओळखल्या व ऐकल्या व कोणकोणत्या भावनेने रडत आहे हे देखील देवाने जाणले. शेवटी सर्व लोक, मायबाप, गाई, गोपाळ आपआपल्या घरी निघून गेले. तुकाराम महाराज म्हणतात, कृष्णाच्या मायबापाची ही गती झाली तर मग विचार करा की, आपल्या अंत:काळी आपल्याला कोण उपयोगी पडेल ह

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग