वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079377 · अभंग क्र. ३८५२

3852.
(बाळक्रीडा अभंग)
निजदास उभा तात्काळ पायापे । स्वामी देखे सर्पे वेष्टियेला ॥१॥
लहानथोरे होती मिळाली अपारे । त्याच्या धुधुकारे निवारिली ॥२॥
निघते आपटी धरूनि धावामधी । एकातेचि वधी माथा पाय ॥३॥
एकी जीव दिले येतांच त्या धाके । येतील ती एके काकूलती ॥४॥
यथेष्ट भक्षिली पोट धाये वरी । तव म्हणे हरी पुरे आता ॥५॥
आता करू काम आलो जयासाठी । हरी घाली मिठी काळीयासि ॥६॥
यासि नाथूनिया नाकी दिली दारी । चेंडू भार शिरी कमळांचा ॥७॥
चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुनी बहुडविले ॥८॥
विसरु न पडे संवगड्या गाई । यमुनेच्या डोही लक्ष त्यांचे ॥९॥
त्याच्या गोष्टी कांठी बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथे हरी ॥१०॥
हरीचे चिंतन करिता आठव । तुका म्हणे देव आला वरी ॥११॥

अर्थ :
कृष्ण कालियाचे मर्दन करण्यासाठी यमुनेच्या डोहात खाली पाताळात गेला त्यावेळी दोघामध्ये प्रसंगानुसार उत्तर प्रत्युत्तर झाले कृष्णाने कालियाला बुक्की मारली त्यावेळी कालियाला कृष्ण्‍ काळ रुपाने आल्यासारखाच वाटला हा आपला जीव घेण्यासाठीच आला आहे असे त्याला वाटत होते त्यावेळी कालियाला आपले गणगोत आठवले व त्याने त्या सर्वांना हाक मारली व तेथे खूप नाग जमा झाले संकटकाळी देवाला भक्तावाचून सोडवणारा दुसरा कोणीही नसतो त्यामुळे देवाने गरुडाचे चिंतन मनामध्ये केले. भगवंताचा निजदास असलेला गरुड भगवंताने स्मरण करताच तात्काळ त्याच्या पायाजवळ हजर झाला पाहतो तर काय सर्पाने आपल्या स्वामींना वेढलेले होते. गरुडाने केवळ फुस्फुस करताच जेवढे काही नाग, सर्प लहान, मोठे जमा झाले होते ते सर्व द

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग