वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079743 · अभंग क्र. ३८७०

3870.
(बाळक्रीडा अभंग)
म्हणविती भक्त हरीचे अंकित । करितो अनंत हित त्यांचे ॥१॥
त्यांसि राखे बळे आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहो नेदी ॥ध्रृ. ॥
पाउस न येता केली यांची थार । लागला तुषार येऊ मग ॥२॥
येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारी शिळांचिये ॥३॥
शिळांचिये धारी वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरे ॥४॥
एक सरे गिरि धरिला गोपाळी । होतो भाव बळी आम्हा ऐसे ॥५॥
ऐसे कळो आले देवाचिया चित्ता । म्हणे तुम्ही आता हात सोडा ॥६॥
हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥७॥
दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलिता ॥८॥
भार आम्हावरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥९॥
निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहो कैसा गिरी धरितोसि ॥१०॥
सिणले हे होते ठायींच्या त्या भारे । लटिकेंचि खरे मानुनिया ॥११॥
यांणी अंत पाहो आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥१२॥

अर्थ :
मी हरीचा आज्ञाधारी भक्त आहे असे जो स्वत:ला म्हणून घेतो त्याचेच अनंत हित करतो. त्या दासांचे रक्षण देव आपल्या बल, बुध्दीने करतो त्यांच्याकडे कळीकाळाला पाहू सुध्दा देत नाही. गोवर्धनगिरी पर्वताच्या आतमध्ये देवाने पाऊस येणार नाही अशी व्यवस्था केली व सर्व लोकांना व जीव जंतूंना राहण्यास ठिकाण निर्माण केले परंतु पावसाचे थोडे थोडे तुषार आत येऊ लागले. त्या गिरीवर दगड येऊन पडत होते, शिळा धारांचा वर्षाव होत होता. सलग सात दिवस शिळा धारांचा वर्षाव चालू होता पावसाने आकांत केला होता जिकडे तिकडे सर्वत्र पाणीच पाणी होते. गोपाळांच्या ठिकाणी असा अहंभाव निर्माण झाला की, सात दिवस आम्ही हा गोवर्धनगिरी उचलून ध

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग