वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079649 · अभंग क्र. ३८७१

3871.
(बाळक्रीडा अभंग)
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुले ते बळ वाखानावे ॥१॥
बळे हुंबरती सत्य त्या न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥
आसुडिल्या माना हात पाय नेटे । तव भार बोटे उचलिला ॥३॥
लटिकाचि आम्ही सीण केला देवा । कळो आले तेव्हा सकळांसि ॥४॥
आले कळो तुका म्हणे अनुभवे । मग अहंभावे सांडवले ॥५॥

अर्थ :
जे वाचाळ खोटे अभक्त दुष्ट गोपाळ होते तेच आपल्या बळाचे वर्णन करत होते. बळेच काही तरी ते हुंबरत होते खरे सत्य काय आहे ते त्यांना कळत नव्हते अशा अंध लोकांचे डोळे कधीही उघडत नसते. आपणच गोवर्धनगिरी उचलला आहे असे त्यांना वाटत होते त्यामुळे त्यांनी आपल्या हातापायाला ताण दिला व हात पाय मोकळे केले व हात पाय सोडून दिले तरीही देवाने आपल्या करंगळीच्या नखावर गोवर्धनगिरी उचललाच होता, ज्यावेळी देवाने गोवर्धनगिरी एकट्याने उचललेला सर्वांनी पाहिला त्यावेळी सर्वजण म्हणाले की, आम्ही व्यर्थ खोटाच श्रम करुन घेतला व देव किती बलवान आहे हे त्यावेळी सर्वांना समजले. तुकाराम महाराज म्हणतात, मग देव किती बलवान आहे हे त्यांना अनुभवाने लक्षात आले व त्यापुढे त्यांनी स्वत:चा अहंभाव टाकून दिला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग