वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 239. जोहार ३८६२ ते ३८९८

जोहार मायबाप जोहार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090448 · अभंग क्र. ३८९४

3894.
जोहार मायबाप जोहार । तू कोण्यागांवीचा महार।पुसाल जरी साचार । तरी सादरपरिसा की जी मायबाप ॥१॥ निराकार माझामुळचा ठिकाणा । भक्तांसाठी सोडीला जाणा । वस्ती करू कायापुरीच्या खुणा । सांगेन की जीमायबाप ॥२॥ जोहार मायबाप जोहार । मीपार्वतीच्या गळ्याचा हार । ईश्वराचा कारभार । मज नफराचे शिरी की जी मायबाप ॥३॥ अखंडदारी पडला असतो । प्रेमाचा तुकडा मागुन खातो । सारी रात्र गोंवरापाशी जागतों । धन्याला दुवा देतोंकी जी मायबाप॥३॥ ४तुम्हीं मुळींचा ठाव सोडुनका । धन्याला तुम्ही विसरूं नका । विसरल्यासपावाल धक्का । अंतकाळीं की जी मायबाप ॥५॥ वस्तीकरू आम्हीसाचें । समस्त कुळवाडीनगरीचें । पैके टाका धन्याचे । बाकी शेकू नका कीजी मायबाप ॥६॥ शेवटी पट्टी झाली । आसामीवर द्वाही दिधली । मज नफरास आज्ञाकेली । धांडोरा पिटीन की ॥७॥ पैल तो मनासीफितवेखोर । येणे थोर लाविला घोर । और बुधाजीबाबा आपुला पोर । नाही तरी धनी कोपतील कीजी ॥८॥ कामाजी बाजीनें काय बरवे केले । आपआपणासी नाडिले । नाही यासी विचारलें । मागे पुढे की जी मायबाप ॥९॥ मदाजी बाजीचेंतरी वेगळंच थोंब । सारा देता उगीच बोंब । धन्यासी कधी सोम । जन्म नाही की जीमायबाप॥१०॥अंताजी महाजन तो आपुलेठायी । नगर नागविले याचे पायी । पहाता कवडीयाचे पदरी । नाही की जी मायबाप ॥११॥ पहादंभाजी चौधरी । याची वेगळीच भरोवरी । आतांकिती याचे घरी । वेरझारी शिणावे की जीमायबाप ॥१२॥ विकल्प शेट्या तरी सदाच घाण । अखंड पहाती आपुला मान । तोंडावरी बैसेलजेंव्हा वहाण।मग डोळे पुसतील की जीमायबाप॥१३॥ जीवाजी बाबा म्हणे । आम्हीत्यांत रहाणे । आता कोणकोणाची दुखवू मने । शेवटी त्यासींच पुसणे होईल की जीमायबाप॥१४॥जीवाजीबाबा म्हणे कशांतकाय । तरी सर्वही कारभार त्याचाचि हाय । त्यांवांचुन हालेल पान काय । तेहि विचारा की जीमायबाप ॥१५॥ तरी हे रज तम सात्विक बाजी । हा सकळ उभारा याचाच की जी । तरी हे दिलेंराखावी राजी । सत्वाजी बाजी की जीमायबाप ॥१६॥ निवृत्तीपासून प्रवृत्ती जहाली । हीअनुभवाची खुण बाणली । साधुसंतांस की ॥१७॥ पैल ते वांसना आवजीने फितूर केला । घरचा भेदबाहेर दिला । हा विचार माझ्या धन्यास कळला । धनी कोपेल की ॥१८॥ आशाई आवाजीचा मोठाचाळा । ज्यासी त्यासी घालीती डोळा । मागतसेनित्य नवा गोळा । परी सर्व जड जाईल की जीमायबाप ॥१९॥ निंदाई आवाचे तोंड मोठे । मागेमागे मोडती बोटे । म्या सांगितले हट्ट टाकूनबोलतीस नेटे । तू कोण गे बुरसे की ॥२०॥ चिताईची तरी खालतीच मान । जेव्हा तेव्हांघालीती धोन । म्या सांगितले तुज पुसतें कोण । वोंगळ येथे का बैसलीस की ॥२१॥ आता हे घरमाझ्याने हिंडवेना । या बायकोचे कर्तव्य कळेना । जोयासी आवरी तो शहाणा । असे की ॥२२॥ तुम्ही खाल्लेरानी सांगता गोष्टी । येईल धन्याचीचिट्ठी । पैसे टके उठाउठी । बाकी ठेवू नकाकी॥२३॥तुम्ही मागे मागे फार बोलता । हेकळेल माझ्या धन्यास वार्ता । तरी दरबारासीजांता । मग मोठे कठीण की ॥२४॥ तरी हा दहापाटलांचा गांव । पंचवीस प्रजांची हाव । पन्नासाचेंनांव । म्या किती घ्यावें की ॥२५॥ जंववरीचालती भर वस्ती आहे । तंववरी कराल तितुकेहोय । यांत डावाडोल झालिया कराल काय । सांगा की ॥२६॥ मग चालता पायाचे वेगडेवळती । जळत्या खांबासी बांधिती । तेथे मगआपुला सारथी । कोणी नाही की ॥२७॥ तरीपांच मिळून विचार करा । प्यादा जपादा हातीधरा । नाही तरी पडेल फेरा । लक्ष चौऱ्याऐंशीचाकी ॥२८॥ आता आम्ही सांगतो ते ऐंका । तुम्हींडोळे झाकू नका । तुम्हांला जोडेल निजसखा । वैकुंठनाथ की ॥२९॥ मी नफर आहे गाढा । तोडीन यमाच्या दाढा । उघडीन वैकुंठीच्या पेठा । नाम कडाडा गर्जेन की ॥३०॥ मी नफर नोहेखोटा । विघ्न लावीन बारा वाटा । नित्य मुक्तीच्याचोहोटा । रहातो की॥३१॥आजि होय होयहोय । आधी होते एक । एकापासून जहालेंअनेक । शेवटी कांही नाही देख । शून्याशून्यमिळाले की॥३२॥एका जनार्दनी जोहार । येणेकेला सारासार विचार । मोडिला अविद्येचा थार । परब्रह्मीं वास करणे की जी मायबाप॥३३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग