जोहार मायबाप जोहार ।
3891.
जोहार मायबाप जोहार । सद्गुरू । जनार्दनाचा एक महार । सांगतो ऐका कलियुगाचाविचार । सावधपणे की जी मायबाप ॥१॥ चारसामाजीं परम । कलियुग हे उत्तम । करावेंहरिभजन सत्कर्म । नामस्मरणे असावे की ॥२॥ नवविधा भक्ती करा । तेणे चुकेल चौऱ्याऐंशीचाका माझे वचनी विश्वास धरा । नाही तरी फसालकी ॥३॥ द्वारी असावे तुळशीवृंदावन । करावेंअतिथीचे पुजन । संतांसी निघावें शरण । हेंलक्षण भक्तीचें की ॥४॥ तुळशीमाळा घालावीगळां । लावावा गोपीचंदन टीळा । मुखी नामस्मरणमाळा । असावी की ॥५॥ व्रत करावे एकादशी । जागर करावा सारे निशी । द्वादशी क्षीरापतीआवडेसी । आदरे सेवावी की ॥६॥ ऐशी वैष्णवभक्तींची लक्षणे । सांगितली सर्व खुणें । हे वर्म जोनेणे । अधर्म साधने करिती की ॥७॥ अठरा वर्णयाती । यांची सांगतो मती । सावधान ऐकानिश्चीती । रागाऊ नका की ॥८॥ आम्हीब्राह्मण म्हणती । स्नानसंध्या वेदपठण न करिती । अशौच कर्म जारणमारण जपती । मोहनस्तंभनादिक की ॥९॥ जगी म्हणती आम्हींसाधिलें । साधन ते दूर राहीले । परस्त्रीने चित्तगोविलें । कुलुलुल की ॥१०॥ झालों म्हणतीसंन्यासी । षड् वैरी हृदयी अहर्निशी । परद्रव्य परअन्नासी । रात्रदिवस लक्षिती की ॥११॥ सहांचाकरावा नाश । तया म्हणिजे संन्यास । नारायणीनाहीं आस । कासया नाश कायेचा की ॥१२॥ पोट भरावया फकीर झाला । अल्ला अल्ला म्हणताजन्म गेला । नसोनि दोष अंगी लाविला । हायदोसहायदोस म्हणती की ॥१३॥ झालों म्हणतीआम्ही जोगी । राख लाविती वाउगीं अंगी । भोगीना त्यागी ना योगी । वर्म नेणती जोगाचेकीं॥१४॥जोग साधावा उत्तम । न करावेंसंसारीक कर्म । साधावें उत्तमोत्तम । वाउगा श्रमकरूं नये की ॥१५॥ आम्ही जंगम झालोम्हणतीं । शिव उपासना न करिती । पोटासाठीभिक्षा मागतीं । शंख वाजविती भं भं भं भंकी ॥१६॥ जालो म्हणती मानभाव । अंतरी शुध्दनाहीं भाव । वर मुंडिती मस्तक वाव । गुरूशिष्यभाव दाविती की ॥१७॥ गुरूशिष्य म्हणती । झोळीस झोळी लाविती । गडबड गुंडा झालाम्हणती । कृष्ण कृष्ण म्हणती की ॥१८॥ नसोनीकाळेपणा लाविती अंगी । उगेच सोंग मिरवितींजगीं । देवाचा द्वेष करिती वाऊंगी । ही फजीतीबरी की ॥१९॥ आम्ही संत जालो म्हणती । गळांमाळा गोपीचंदन लाविती । दिवटी घेऊनी हाती । उदो उदो करिती की ॥२०॥ पोट भरावया कीर्तनकरिती । लोका अर्थ सर्व दाविती । भाळे भोळेभोंदिती । आपण वर्म नेणती कीर्तनाचें की ॥२१॥ परद्रव्य परनारीसी । स्पर्श न करावा निश्चयेसी । ऐशी मर्यादा सांगती लोकांसी । आपण तेंचि कर्मकरिती की ॥२२॥ एकविध भक्ती करावी म्हणती । ना ऐकावी आणिकांची स्तुती । काई व्यथाजालिया शरीराप्रती । मग देवऋषी पहातीकी॥२३॥आणिती निबंनारळ उद सामान । मेंढरेंकोबडें मारिती जाण । वेताळ महीषासूर पूजन । नग्न होऊन करिती की ॥२४॥ म्हणती खंडेरावदैवत आमुचे । ते कोपले वासाचें । कुळधर्मसांडीलें वडीलांचे । म्हणोनि दुःख पावले की ॥२५॥ मग गोपीचंदन टाकीती । आदरे भंडारलाविती । भरीत रोडगे करिती । यळकोटयळकोट म्हणती की ॥२६॥ ऐकोनी कीर्तनश्रवण । गीता ज्ञानेश्वरी मनन । अश्वीन मासआलीया जाण । शक्ती पूजन करिती की ॥२७॥ ऐशीयासी एकनिष्ठ भाव । तयासीं कायसे वैभव । उगेच सोंगाचे गौरव । वाढविती की ॥२८॥ एकविधा भक्ती करावी । वाट आणिकांची नपहावी । शुभाशुभ येती बरवी । ते प्रारब्धदशेंप्रमाण की ॥२९॥ जैसे पतिव्रतेचें मन । सर्वपतीच प्रमाण । अपाय उपाय हे तो जाण । ईश्वरप्रमाण की ॥३०॥ एका शरण जनार्दन । मीबोलिलो सत्यवचन । अनुभवुनी खुण । या पंथेंजाऊ नका की जी मायबाप॥३१॥
