वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079577 · अभंग क्र. ३८८४

3884.
(बाळक्रीडा अभंग)
अनुसरे तया फिरो नेदी मागे । राहे अंग संगे समागमे ॥१॥
अंगसंग असे क्रम साक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसे फळ ॥धृपद॥
फळपाकी भोग देतील प्राणीये । तुका म्हणे नये सवे काही ॥२॥

अर्थ :
जो देवाला अनुसरुन राहतो देवाच्या अंगसंगतीत राहतो देवाच्या सोबत असतो त्याला देव कधीही पुन्हा संसाराकडे मागे येऊ देत नाही. देव सर्वांच्या अंत:करणात व्यापलेला आहे त्यामुळे सर्वांच्या कर्माचा साक्षी तोच आहे ज्याचा जसा भक्तिभाव असेल त्याचा तसे फळ देव त्याला देतो. तुकाराम महाराज म्हणतात, जशा प्रकारचे कर्म मनुष्य करेल तशा प्रकारचे फळरुपी भोग त्याला प्राप्त होतात आणि संचित कर्मावाचून मनुष्या काहीही बरोबर जात नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग