(हिंदुस्तानी भाषेतील
3507.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥धृपद॥
ये हि तन करते क्या होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥१॥
रामनाम मोल नहि वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥२॥
कहे तुका मनसु मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥३॥
अर्थ :
पुन्हा पुन्हा तू का मरतोस आहेस अरे अभागी मनुष्या पुन्हा पुन्हा मरणे हेच तुझ्या भाग्यात आहे की काय ? अरे या मनुष्य देहात तू ठरवले तर काय करु शकत नाहीस त्यामुळे सर्वकाही सोडून दे आणि हरी भक्ती आणि भजन कर तू वैकुंठाला जाशील. अरे रामनाम घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मोल किंवा कवडी खर्च करावी लागत नाही याउलट ते रामनामच तुला सर्व मायेतून सोडवते. तुकाराम महाराज म्हणतात, तू मनापासून रामाची भक्ती करण्याचा निश्चय जवळ राखून ठेव आणि नित्य जिभेने रामरस चाखत राहा.
