श्रीज्ञानदेवांची स्त
3507.
श्रीज्ञानदेवांची स्तुति - अभंग ३५०७ ते ३५३३
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । ते या भूमीवर अलंकापूर ॥१॥
तये स्थळी माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनिया ॥२॥
सिध्देश्वर स्थान दरुशने मुक्ती । ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर ॥३॥
चौर्यांयशी सिध्दांचा सिध्द भेटी मेळा । प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ॥४॥
तयासी नित्यतां घडता प्रदक्षणा । नाहीम पार पुण्या वास स्वर्गी ॥५॥
अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनि तीर्थराज ॥६॥
ऐशिया स्थळीं समाधी ज्ञानदेवा । एका जनार्दनी ठाव अलंकापूर ॥७॥
