वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(हिंदुस्तानी भाषेतील

🙏 3. संत तुकाराम · ABH-080660 · अभंग क्र. ३४९६

3496.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊ मेरे तनकी पैजार ॥धृपद॥
हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥१॥
जातनसु मुजे कछु नहि प्यार । असते की नही हिंदु धेड चंभार ॥२॥
ज्याका चित लगा मेरे रामको नाम । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥३॥

अर्थ :
माझ्या रामाचे नाम जो वारंवार घेईन त्याच्या पायात मी माझ्या देहाच्या कातडयाचे पायताण करुन राहीन. हसताना, खेळताना, वाटेने चालताना, जेवण जेवताना, खाटेवर झोपताना जो वारंवार रामाचे नामस्मरण करतो तो मला खूप आवडतो. मला कोणत्याही जातीविषयी अजिबात प्रेम नाही कोण स्पृश्य हिंदू असो किंवा अस्पृश्य हिंदू असो नाहीतर कोणी चांभार असो मला त्याच्याशी काहीही कर्तव्य्‍ नाही जो रामाचे नाम प्रेमाने घेतो त्याच्याविषयी माझे प्रेम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे चित्त रामाच्या नामाशी एकरुप झाले आहे त्याच्या पायाशी माझे चित्त एकरुप झाले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग