(हिंदुस्तानी भाषेतील
3499.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
भले रे भाई जिन्हे किया चीज । अछा नहि मिलत बीज ॥१॥
फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥धृपद॥
तीरथ बरत फिर पाया जोग । नहि तलमल तुटति भवरोग ॥२॥
कहे तुका मै ताका दासा । नहि सिरभार चलावे पासा ॥३॥
अर्थ :
ज्या मनुष्यांनी मनुष्य देहात येऊन त्याचे चीज केले ते खूप भले आहेत कारण चांगल्या बीजाचे मनुष्य लवकर भेटत नाहीत. अनेक जन्म फिरत फिरत शेवटी सारभूत असलेला मनुष्यदेह तू मिळवला आहेस आणि याच जन्मात तू धन दार याचा त्याग करु शकतोस. काही लोक सर्व धन दाराचा त्याग करुन तीर्थयात्रा करत फिरत असतात परंतू तरी देखील त्यांची भवरोगाची तळमळ काही तुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याच मनुष्याचा दास आहे जो आपल्या माथ्यावर कोणत्याही प्रकारचा भार घेऊन चालत नाही व अशा मनुष्या जवळच मी नेहमी जात असतो.
