वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(पंढरीस जाणाऱ्या वार

🙏 3. संत तुकाराम · ABH-079875 · अभंग क्र. ३५४२

3542.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
काही माझे कळो आले गुणदोष । म्हणऊनी उदास धरिले ऐसे ॥१॥
नाही तरी येथे न घडे अनुचित । नाही ऐसी रीत तया घरी ॥धृपद॥
कळावे ते मना आपुलिया सवे । ठायीचेहे घ्यावे विचारूनी ॥२॥
तुका म्हणे मज अव्हीरीले देवे । माझीया कर्तव्ये बुद्धीचिया ॥३॥

अर्थ :
माझे काही गुणदोष देवाला कळून आले आहे की काय म्हणूनच तो माझ्याविषयी असा उदास राहिला आहे ? नाहीतर देवाकडून असा अनुचित प्रकार घडलाच नसता भक्तांविषयी उदासिनता धरावी अशी रीत देवाच्या घरची नाही आपल्यामध्ये काय गुणदोष आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे आणि माझ्यामध्ये काय गुणदोष आहेत हे जर मला कळले तर त्याचा मी समूळ नाशच करेन. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बुध्दीचा काहीतरी दोष असावा त्यामुळेच देवाने माझा अव्हेर केला असेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग