मुक्तपणें मुक्त श्रे
3542.
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्री वरिष्ठ आदिशक्ती ॥१॥
जगाच्या उध्दारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढ जन ॥२॥
अज्ञानासी बोध सज्ञानाची शुध्दी । तोडिली उपाधी सर्वत्रांची ॥३॥
लडिवाळ तान्हें एका जनार्दने । कृपा असो देणे मजवरी ॥४॥
