(पंढरीस जाणाऱ्या वार
3543.
(पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
नव्हे धीर काही पाठवू निरोप । आला तरी कोप येऊ सुखे ॥१॥
कोपोनिया तरी देईल उत्तर । जैसे तैसे पर फिरावूनि ॥धृपद॥
नाही तया तरी काय एक पोर । मज तो माहेर आणीक नाही ॥२॥
तुका म्हणे असे तयामध्ये हित । आपण निवांत असो नये ॥३॥
अर्थ :
आता देवाकडे पुन्हा निरोप पाठवण्याविषयी मला धीर निघवत नाहीये आणि पुन्हा निरोप पाठवल्याबद्दल देवाला राग आला तर येऊ दयावा. रागाच्या निमित्ताने हा होईना देव मला काहीतरी उत्तर तरी देईल आणि जसे देईन तसे उत्तर देवोत आणि जर पटले तर ठिक नाही पटले तर पुन्हा देवाला निरोप पाठवता येईल. देव कोणा कोणाच्या निरोपाचे उत्तर देईल त्याला पोर आहे काय परंतू असे जरी असले तरी मला तर माहेर तेवढेच एक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, परंतू आपण मात्र निवांत बसून सारखे त्याला निरोप पाठवत राहावे यामध्येच आपले खरे हित आहे.
