वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

स्तुती तरि करू काय क

🙏 3. संत तुकाराम · ABH-079777 · अभंग क्र. ३५३०

3530.
स्तुती तरि करू काय कोणापासी । कीर्ती तरि कैसी वाखाणावी ॥१॥
खोटया तव नाही अनुवादाचे काम । उरला भ्रम वरी बरा ॥धृपद॥
म्हणवावे त्याची खुण नाही हाती । अवकळा फजिती सावकाश ॥२॥
तुका म्हणे हेंगे तुमचे माझे तोंड । होऊनिया लंड आळवितो ॥३॥

अर्थ :
देवा तुझी स्तुती तरी काय व कोणापाशी करु आणि तुझ्या किर्तीचे वर्णन तरी कसे करु ? देवा अहो मला तुमचे खरे स्वरुपच समजले नाही तर मग लोकांजवळ तुमच्या स्वरुपाचे वर्णन करु तरी कशासाठी उगाच खोटे वर्णन करुन काय उपयोग आहे त्यापेक्षा लोकांमध्ये तुमच्या स्वरुपाचे भ्रम राहीले तरी ते बरे परंतू खोटे वर्णन मी करणार नाही. देवा आम्ही तुमची किर्ती करावी परंतू त्याचा अनुभवच आमच्या हाती नाही त्यामुळे आमची अवकळा होते व लोक आमची अगदी सावकाशपणे फजिती करतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा असे असले तरी देखील मी निर्लज्ज होऊन तुमचे वर्णन माझ्या मुखाने करीत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग